Voter List Row: दुबार मतदारांवरून भाजप-मनसेत जुंपली, शेलारांचा ठाकरेंना थेट सवाल

Continues below advertisement
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'सत्याचा मोर्चा' काढून दुबार मतदारांवरून (duplicate voters) केलेल्या आरोपांना भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. शेलार यांनी, 'ठाकरेंना भोईर पाटील हेच दुबार मतदार दिसले? अन्सारी शेख दिसले नाहीत का?' असा थेट सवाल करत ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीवर (MVA) टीकेची झोड उठवली. MNS आणि MVA केवळ हिंदू, मराठी आणि दलित मतदारांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. भाजपने 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून या आरोपांना उत्तर देण्याची भूमिका घेतली असून, मतदार यादीतील घोळ सर्वांसमोर आणणार असल्याचे म्हटले आहे. एकसारखे नाव पण वेगळा पत्ता, एकसारखा फोटो पण वेगळे नाव अशा अनेक त्रुटींवर शेलार यांनी बोट ठेवले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola