Voter List Row: 'राज ठाकरेंना केवळ हिंदूच दुबार मतदार दिसतात का?'; Ashish Shelar यांचा MVA नेत्यांवर पलटवार
Continues below advertisement
मतदार याद्यांमधील घोळावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले असून, भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'कर्जत जामखेड मध्ये ५,५३२ मुस्लिमांची दुबार मतं होती', असा थेट आरोप आशिष शेलार यांनी केला. शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार (Rohit Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या मतदारसंघातील आकडेवारी सादर करत हजारो मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार दुबार असल्याचा दावा केला. या आरोपांना उत्तर देताना, मविआ नेत्यांनी मतदार यादीत घोळ असल्याचे मान्य केले, पण भाजपने याला धार्मिक रंग देऊ नये, अशी भूमिका घेतली. 'कुठलाही दुबार मतदार, कुठल्याही धर्माचा असो, तो मतदार यादीत नसावा,' असे वरुण सरदेसाई म्हणाले. जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement