Voter Fraud: 'मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये', Fadnavis यांची Aaditya ठाकरेंवर जहरी टीका.

Continues below advertisement
शिवसेनेच्या (UBT) निर्धार मेळाव्यात (Nirdhar Melava) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बोगस मतदारांचा (Bogus Voters) मुद्दा उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, 'आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये', असा खोचक टोला लगावला आहे. आपल्या पॉवरपॉईंट सादरीकरणात, आदित्य ठाकरे यांनी दावा केला की वरळी (Worli) मतदारसंघाच्या मतदार यादीत सुमारे १९,३३३ नावे संशयास्पद आहेत. त्यांनी विठ्ठल झाड आणि राजा कुप्पुरस्वामी यांसारख्या एकाच मतदाराची अनेक नावे असल्याची उदाहरणे दिली. या आरोपांना प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, जे मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते ते आता पराभव समोर दिसल्याने मतदार याद्या मोजू लागले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola