Devendra Fadnavis : व्होट जिहाद शब्दासाठी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तक्रार

Continues below advertisement

Devendra Fadnavis :  व्होट जिहाद शब्दासाठी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तक्रार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाला, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरुन त्या वक्तव्यावरुन निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

काँग्रेस कमिटीच्या सचिवांकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकर यांनी ॲड.असीम सरोदे यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला तक्रार आणि कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यामध्ये वोट जिहाद या शब्दाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वापर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद करण्यात आला. धुळे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघात आपला उमेदवार आघाडीवर होता. मात्र, केवळ मालेगाव मध्ये मतदारसंघात 1 लाख 94 हजार मतांनी आपला उमेदवार मागे जातो. आणि चार हजार मतांनी पराभूत होतो.  निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही, कधी आपला पक्ष जिंकेल, तर कधी तो पक्ष जिंकेल. मात्र, संघटीत मतदान करुन हिंदुत्ववादी पक्षाला पराभूत करु शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून 48 पैकी 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram