Vote Jihad : '...एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप

Continues below advertisement
मतदार याद्यांमधील (Voter List) घोळ आणि दुबार मतदारांवरून विरोधी पक्षांनी रान उठवले असताना, भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी 'वोट जिहाद'चा (Vote Jihad) मुद्दा उचलून धरला आहे. या वादात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनीही उडी घेतली आहे. 'वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद करून उद्धव ठाकरेंना एका खानाला मुंबईवरती लादायचंय,' असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी, मतदार यादीतील चुका मान्य करून शेलारांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीसांना 'पप्पू' ठरवले आहे, असा खोचक टोला लगावला. तर, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिका आम्हीच जिंकू आणि ठाकरेंना माझं अभिनंदन करावंच लागेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola