Vishal Patil Vishwajeet Kadam : प्रेमाने गळाभेट, कौतुकाची थाप, संसदेत विशाल-विश्वजीत एकत्र!

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Lok Sabha Elections) महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) महायुतीचा (Mahayuti) धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून (Sangli Lok Sabha)  दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी (Vishal Patil)  पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विशाल पाटील यांनी  मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट  घेतली. आमदार विश्वजीत कदम देखील या वेळी उपस्थित होते. राहुल गांधी देखील विशाल पाटील आणि विश्वजीत कदमच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. 

अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले. दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत  विशाल पाटील यांनी दिले. काँग्रेसला समर्थनचे पत्र  दिले. विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत. विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचे भेटून अभर मानले. आम्ही उमेदवारीसाठी अटीतटीची प्रयत्न केले. मी कुठलीच शर्थ न ठेवता मी पाठींबा जाहीर केला. मी काँग्रेस सोबत राहणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram