Vishesh Majha | कोरोनाची दाखवून भीती पोल्ट्रीवाल्यांची कुणामुळे माती?

Continues below advertisement
महाराष्ट्रात दीड कोटीच्या सुमारास कोंबड्या पडून असून गेल्या 7 दिवसात 600 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोंबडी उद्योग म्हणजे शेतक-याच्या घरचं एटीएमच जणू. शेतीला पूरक असा हा उद्योग. ग्रामीण तरूणाईसाठीचा हक्काचा व्यवसाय. मात्र, या कोरोनाच्या अफवांनी शेतकरी किंवा पोल्ट्रीकडून कोंबड्या विकत घेतल्या जात नाही. खाटिकाकडेही इतरवेळी 150 रू. किलोनं जाणारी कोंबडी 20, 30 रु. किलोनंही कुणी घेत नाही. म्हणूनच, हे असं कसं झालं? यामागे अन्य राज्यातील पोल्ट्री उद्योगाची लॉबी किंवा बहुराष्ट्रीय अन्न उद्योगातील कंपन्या आहेत का? मुळात कोंबड्यांना आणि त्या खाल्ल्यावर माणसांना कोरोना होईल का? यावरच आज 'माझा विशेष'मध्ये चर्चा झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram