Vishalgad Fort Clashes : विशाळगडावर स्थानिकांवर दगडफेक? नेमकं काय घडलं?

Vishalgad Fort Clashes : विशाळगडावर स्थानिकांवर दगडफेक? नेमकं काय घडलं?

किल्ले विशाळगडवर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार  आहेत, आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट करताना 13 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला. आता गप्प बसून चालणार नाही, कुठेतरी भूमिका घेतलीच पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे. 

विशाळगडावरील अतिक्रमण काढावं अशी भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे...येत्या 14 जुलै रोजी राज्यभरातील शिवभक्तांना विशाळगडावर पोहोचण्याचं आवाहन संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी आज केले आहे...या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाजीराजे यांना बैठकीची विनंती केली होती...मात्र संभाजीराजेंनी बैठकीचे निमंत्रण धूडकावत कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर जाणारच असल्याचं पत्रकाद्वारे स्पष्ट केलं... संभाजीराजेंच्या समर्थकांनी देखील पत्रकार परिषद घेत रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.. तसेच या विषयावर संभाजीराजे राजकारण करत नसून गेल्या कित्येक वर्षांपासून विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी संभाजीराजेंनी स्वतः पाठपुरावा केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

त्यातच आता विशाळगडावर हा दगडफेकीचा प्रकार समोर आल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola