Vishalgad Controversy Special Report : कारवाई कडक; अतिक्रमणावर धडक,विशाळगडाचा मुद्दा चांगलाच तापला

Continues below advertisement

Vishalgad Controversy Special Report : कारवाई कडक; अतिक्रमणावर धडक,विशाळगडाचा मुद्दा चांगलाच तापला कोल्हापूरच्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापलाय... या अतिक्रमाणावर कारवाई सुरू झाल्याने आधीच वाद झालेला असताना, तिथंस झालेली तोडफोड आणि जाळपोळही कळीचा मुद्दा बनलाय... पाहूयात... विशाळगडावर नेमकं काय झालंय?  ज्याच्या अंगाखांद्यावर छत्रपती शिवरायांच्या  पदस्पर्शाच्या खुणा आहेत...  मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार अन्  महाराष्ट्राचा अभिमान आणि हिंदवी स्वराज्याचा   स्वाभिमान... असा हा कोल्हापूरचा विशाळगड...   आता वेगळ्याच कारणांनी चर्चेत आलाय... आणि  त्याचं कारण आहे... विशाळगडावरील   अतिक्रमण... याच अतिक्रमणांविरोधात आंदोलन  करत तिथं तोडफोड आणि जाळपोळ करण्यात  आली... छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-धर्माच्या  भिंती झुगारत, मानवतेला महत्त्व देणारं स्वराज्य  उभं केलं... त्याच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन  झालेल्या विशाळगडावर अतिक्रमण होणं हे   चुकीचं आहेच... पण त्याच भूमीत वादाचे आणि   तोडफोडीचे प्रकार होणं हेही तितकंच दुर्दैवीही   आहे. त्यामुळे हा वाद थांबवून कायदा-सुव्यवस्था  राखण्याची जबाबदारी सर्वांनीच घेण्याची गरज  निर्माण झालीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram