Vishal Patil : विशाल पाटील बंडखोरीवर ठाम ? कार्यालयावरून काँग्रेस नेत्याचा फोटो गायब
Continues below advertisement
Vishal Patil : विशाल पाटील बंडखोरीवर ठाम ? कार्यालयावरून काँग्रेस नेत्याचा फोटो गायब सांगली लोकसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे,त्यामुळे लोकसभेच्या मैदानातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे माघार घेणार का ? की आपली बंडखोरी कायम ठेवणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. पाटील यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत काही दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर होते, त्यांनी देखील विशाल पाटील अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला होता. दरम्यान, सांगलीतल्या काँग्रेस भवनाजवळ विशाल पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. त्याचं नामकरण वसंतदादा भवन असं करण्यात आलं आहे, तसंच वसंतदादा पाटील यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे. मात्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो तिथं दिसत नाहीये.
Continues below advertisement