Ganesh Visarjan 2021 : वाशिम येथे मिरवणुकीविना गणपती बाप्पांचं विसर्जन, घरगुती बाप्पांनाही साधेपणाने निरोप
मनोज जयस्वाल, एबीपी माझा
Updated at:
19 Sep 2021 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Visarjan : वाशिमच्या गणपती विसर्जनाच्या सर्वाधिक काळ चालणाऱ्या मिरवणुकीची चर्चा असते मात्र कोरोना मुळे यावर्षी विसर्जन प्रक्रिया साध्या पद्धतीने होणार आहे. दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.