Virat Kohli Coach Rajkumar Sharma : विराट कोहलीसारखंच खेळ, सामन्यापूर्वी कोचने काय सल्ला दिला?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVirat Kohli Coach Rajkumar Sharma : विराट कोहलीसारखंच खेळ, सामन्यापूर्वी कोचने काय सल्ला दिला? भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयानंतर टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पुण्यात बोलताना टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाच्या या विजयात काहीजणांनी सर्जिकल स्ट्राईकसारखा चमत्कार दाखवला, कोणी चांगला झेल घेतला. या सगळ्यामुळे आपण विश्वचषक स्पर्धेतील (T 20 World cup) विजयाचा दुष्काळ संपवला, असे शरद पवार यांनी म्हटले. भारतीय संघाला अत्यंत उत्तम शिक्षक मिळाला. द्रविड यांची कामगिरी महत्त्वाची आहे. द्रविड यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले सल्ले यामुळे सामूदायिक यश मिळाले, असेही शरद पवार यांनी सांगितले.