Raireshwar Fort : रायरेश्वर गडावर दारू पार्टी, शिवप्रेमी आक्रमक; तरुणांना दिला चोप

Continues below advertisement
रायरेश्वर (Raireshwar) किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना शिवप्रेमींनी (Shivpremis) चोप दिला, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. 'बॉटल इधर फेक दे वरना तारे तुलचं सर फोड दूंगा अभी,' असा दम देत संतप्त शिवप्रेमींनी गुरुप्रेम सिंग (Guruprem Singh) आणि आलम (Alam) नावाच्या तरुणांना जाब विचारला. ट्रेकिंगसाठी गेलेल्या शिवप्रेमींना हे तरुण दारू पिताना दिसल्यानंतर त्यांनी दारूच्या बाटल्या फोडल्या आणि त्यांना चोप दिला. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या असून, या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक गडांवर दारू पिण्यास मनाई असल्याचे फलक लावले असले तरी, पर्यटक आणि परप्रांतीय त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या सुरक्षेचा आणि पावित्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola