Dhule Milk Adulteration: दूध भेसळीचा धक्कादायक व्हिडिओ, उकळल्यावर झाला रबर!
Continues below advertisement
धुळ्यातील शिरपूर (Shirpur) शहरात भेसळयुक्त दुधाचा (Adulterated Milk) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या (Diwali) सणासुदीच्या काळातच हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 'अन्न आणि औषध प्रशासन विभाग (FDA) कारवाई का करत नाही?', असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दूध उकळल्यानंतर ते रबरासारखे ताणले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे दूध खरेदी केल्यानंतर काही तासांतच खराब झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. या घटनेमुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या पॅकेटबंद आणि खुल्या दुधाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवरही टीका होत असून, या भेसळ माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement