Vinod Tawde Promoted : भाजपचे नेते विनोद तावडे यांना बढती, केंद्रीय भाजप कार्यकारिणीत सरचिटणीस पद
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 03:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत सरचिटणीसपदी बढती देत राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडल्यानंतर विनोद तावडेंना कार्यकारिणीत महत्वाचं स्थान दिलं आहे. याआधी प्रमोद महाजन यांनी केंद्रात दीर्घकाळ सरचिटणीसपद भूषवलं होतं. तर नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या तावडे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.