Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
आजारी विनोद कांबळीही त्यांच्या तब्येतीच्या चिंतेनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसले. सचिन आणि कांबळी या बालपणीच्या दोन मित्रांनीही सोहळ्यादरम्यान काही क्षण शेअर केले. २०१९ मध्ये आचरेकर गुरुजींचे निधन झाले होते. आचरेकर यांनी भारतासाठी खेळलेल्या अनेक खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन दिले होते. तेंडुलकर आणि कांबळी यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तेंडुलकर आणि कांबळी आणि यांसारख्या अनेक खेळाडूंनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. हा कार्यक्रम त्यांच्या चिरंतन वारसाला श्रद्धांजली वाहणारा होता. रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विनोद कांबळी यांनी एक हिंदी गाणे गायले. त्याचा आवाज जरी तुटला असला तरी चेहऱ्यावरची भाषा भडकपणे उमटत होती."सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाये - आजा प्यारे पास हमारे काहे घाबराये, काहे घबाराये," हे गाणे कांबळीने स्टेजवर गायले आणि मग 'लव्ह यू सर' म्हणत आपले छोटेसे भाषण संपवले. यानंतर तेथील उपस्थित संपूर्ण जनसमुदाय सुन्न झाला आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी टाळ्या वाजवल्या. बालपणीच्या मित्राला भेटण्यासाठी सचिन कार्यक्रम सुरु होण्याआधीच आला तेव्हा कुठेतरी कांबली यांना सुरुवातीला लक्षात आले नाही की तो त्यांचा मित्र सचिन आहे ते.