Vinod Kambli Health Update| त्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तब्येतील सुधारणा; विनोद कांबळी रडले....
Vinod Kambli Health Update| त्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तब्येतील सुधारणा; विनोद कांबळी रडले....
भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
विनोद कांबळींनी काल रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी क्रिकेट कधीही सोडलं नाही, आणि कधी सोडणारही नाही. इतकी शतकं, द्विशतकं केली आहेत, सगळं लक्षात आहे माझ्या, असं विनोद कांबळींनी सांगितले. आयुष्य भरभरुन जगा, दारु पिऊ नका, कारण आई-बाबांना ते आवडणार नाही, असं आवाहन विनोद कांबळींनी तरुणांना केलं आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी तुला प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, असं सांगितलं असता, विनोद म्हणाला, सचिन बोलला, माझी तब्येत ठीक नव्हती, पण त्याचा नेहमी आशीर्वाद असतो, असं विनोद कांबळींनी सांगितले.