Loksabha : लोकसभेतल्या 'त्या' भाषणाबद्दल नारायण राणेंचं स्पष्टीकरण, तर विनायक राऊतांचा रोणेंना टोला
लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत खासदार कनी मोझी यांनी जो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता त्याचं उत्तर देताना नारायण राणेंचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. लोकसभेत बोलण्याची राणेंची पहिलीच वेळ होती. अभ्यास तेव्हढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. त्या राणेंच्या गोंधळावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढं देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये असा टोला राणेंना दिला. स्वाभिमान पक्षाचे काही लोक हे विकृतीने पाषाडलेले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदी काय, इंग्रजी काही भाषेचा संबंध नसतो. मराठी सुध्दा नाही. त्यामुळे कुठे ना कुठे घाण करायची अश्या पद्धतीने त्याच काम आहे. लोकसभेत मला सुध्दा प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायाला पाहिजे.