Narayan Rane यांचा संयम पुर्णपणे तुटलेला आहे, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे : Vinayak Raut

नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा शिगेला पोहोचलेला असताना मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज संभाव्य अटकेबाबात नारायण राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.  

यावर Vinayak Raut यांनी Narayan Rane यांचा संयम पुर्णपणे तुटलेला आहे, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे  असं उत्तर दिलं आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola