Maha Vikas Aghadi | कोकणातला प्रकल्प लातूरला हलवा, अमित देशमुखांच्या मागणीवर विनायक राऊत भडकले!

Continues below advertisement

कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. तसंच महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी जेणेकरुन समन्वय राहिल, असंही विनायक राऊत म्हणाले. परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरुन ठाकरे सरकारमधील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे.
केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. "आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत," अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram