Vinayak Mete Family Reaction : विनायक मेटे यांच्या भाचीचे अश्रू अनावर ABP Majha

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी ते रात्रीच बीडमधून तातडीनं मुंबईकडे निघाले आणि वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला.... खरं तर कुटुंबीय त्यांना पहाटे निघा असं सांगत होते.... पण बैठकीसाठी म्हणून ते रात्रीच निघाले आणि पहाटे अपघाताची बातमी आली.... अशा शब्दांत विनायक मेटे यांच्या वहिनी वैशाली मेटे यांनी माझाशी बोलताना मनातली रुखरुख व्यक्त केली...., तेव्हा विनायक मेटे यांच्याबाबतीत काळही आला होता आणि वेळही आली होती, अशीच काहीशी भावना समोर आली..... मेटे यांच्या अपघाती निधनानं मेटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सगळ्यांची काळजी घेणारा कुटुंबप्रमुख गमावला असं सांगताना वैशाली मेटे यांना अश्रू अनावर झाले.... आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी वैशाली मेटे यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी मेटे यांचा कालचा दिनक्रमच सांगितला..... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola