Vinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं

Continues below advertisement

Vinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं 

 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत झालेल्या महाविकास आघाडीने एकीकडे ईव्हीएम विरोधात प्रश्न उपस्थित केला असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी आता ईव्हीएमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. ईव्हीएमच्या समर्थनार्थ विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि जत विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडून आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. ईव्हीएम मशीनविरोधात फेक नॅरेटिव्ह तयार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा मविआचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप केला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता हे दोघेही एकदिवसीय आंदोलन करणार आहेत.  

महाविकास आघाडीचे आरोप म्हणजे राज्यातील जनतेनं केलेल्या मतदानाचा अपमान असल्याचं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत म्हणाले. ईव्हीएमच्या समर्थनार्थ मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram