Vikas Thackeray : नागपुरात भाजपला मोठा झटका बसेल, लढत जोरदार होणार : विकास ठाकरे

Continues below advertisement

.

नागपुरातून नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा नाव निश्चित होऊनही पहिल्या यादीत त्यांचा नाव जाहीर झालेला नाही... त्यावर विकास ठाकरे यांनी सुचक प्रतिक्रिया दिली आहे... काँग्रेसचा असाच असते, अखेरच्या क्षणी आम्ही झटका देतो... मागच्या वेळेला नाना पटोले यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून भाजपला झटका दिला होता... यंदाही तसेच होईल असे विकास ठाकरे म्हणाले... निकालातून नितीन गडकरी आणि भाजपला झटका मिळेल की नाही हे नागपूरची जनता ठरवेल असेही ठाकरे म्हणाले.. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नागपूर भाजप प्रत्येक निवडणूकीत पराभूत होत आहे.. आणि तीच मालिका यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये ही कायम राहील.. नागपूर शहरात गेले दहा वर्ष मी काँग्रेस अध्यक्ष आहे... गेले दहा वर्षापासून आमची तयारी सुरू आहे.. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या विरोधातील लढत जोरदार होईल असा दावाही त्यांनी केला आहे... माझ्या नावाचा प्रस्ताव नागपुरातील तीनही ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी दिला आहे.. त्यामुळे ते सर्व माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास असल्याचे मतही विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram