Vijay Wadettiwar : भाजपाचं धोरण म्हणजे उपयोगी आहे तो पर्यंत वापरायचं, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
Vijay Wadettiwar : भाजपाचं धोरण म्हणजे उपयोगी आहे तो पर्यंत वापरायचं, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल भाजपाचं नेहमीच धोरण आहे, उपयोगी आहे तो पर्यंत वापरायचं राष्ट्रवादीची उपयुक्तता संपलीय आणि डसबीनमध्ये जातात त्यांच्यावर अशी परिस्थिती येऊ नये या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात ते पहावं लागेल पाहू पुढे काय होतय ते लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला 19 जागा मिळाल्या तर भाजपने फक्त 9 जागांवर यश संपादन केले. महायुतीच्या (Mahayuti) पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला सरकारमधून मोकळं करावे, अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.