Vijay Wadettiwar on Vidarbha Constituency : विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती, पाचही जागा आम्ही जिंकू : वडेट्टीवार

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on Vidarbha Constituency : विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती,  पाचही जागा आम्ही जिंकू : वडेट्टीवार विदर्भात एकूण काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे, पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल  विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे, हुकूमशाही  पद्धतीने सरकार काम करतोय त्यामुळे लोकांना भीती वाटते की स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम असू  जनतेने ठरवले आहे भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर काढायचं.. गडचिरोली तर आम्ही जिंकूच, भाजपला दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत आमचे किरसान उभे आहेत, ते निवडून येतील   मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, धानोरकर भेटल्या नसत्या. तरीही चंद्रपूरला गेलो असतो, 9 आणि 10 ला प्रचाराला जाणार..  मी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार   भंडारा-गोंदिया मध्ये उमेदवार नवखा असला तरी तो तगडा आहे, काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे   राहुल गांधींची सभेची तयारी साकोली ला होणार आहे   सांगली चा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही, ती जागा सुरवातीपासून काँग्रेसची होती, सगळ्या वादात फार ताणून घ्यायचे नाही, नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील   शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली, उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणारे आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत अशी माहिती आहे  शिंदे आणि अजित पवार गटही गोंधळलेले आहेत, भाजपचाही दमछाक होत आहे, इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram