Vijay Wadettiwar Meet Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची भेट; वडेट्टीवारांच्या डोळ्यात पाणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar Meet Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची भेट; वडेट्टीवारांच्या डोळ्यात पाणी
विजय वडेट्टीवार भावुक
लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेले विजय वडेट्टीवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, "ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येते आणि जाते, पदाचा मी कधीच विचार केला नाही. हे छत्रपती शिवरायांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. या पुरोगामीत्वाला धक्का लावण्याचे काम 2014 साली सुरू झालं. सरकारचे शिष्टमंडळ उद्या येणार आहे. लक्ष्मण हाकेंना पूर्ण अभ्यास आहे. सगेसोयऱ्यांचा विषय न्यायालयात टिकणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, मग त्याचा अध्यादेश कशाला काढताय. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहिले असून सामाजिक सलोखा उद्ध्वस्त होत आहे."
आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला.