Chandrapur मधील घटना मन हेलावणारी, या प्रकरणी एकालाही माफ केले जाणार नाही : Vijay Wadettiwar

Continues below advertisement

जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण गावादेखत या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. पण तरिही त्यांना मदत करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अंगात येणाऱ्या महिलेनं नाव घेतलं म्हणून कुटुंबाला ही अघोरी शिक्षा दिली गेली आहे. 

चंद्रपुरात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 जणांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांकडून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. जिवती तालुक्यातील वणी-खुर्द या गावात ही घटना घडली. शनिवारी दुपारी भर चौकात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्याती करण्यात आली होती. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

घटनेबाबत बोलत असतांना Vijay Waddetiwar म्हणाले, अत्यंत अमानुष आणि समाजाचे मन हेलावणारी ही घटना आहे. संबंधीत १३ लोकांना अटक केली आहे.तरुणांनी पुढे येऊन अशा घटना थांबवायला हव्यात.अशिक्षितपणा रुढ आहे हे या घटनेवरून दिसते.  प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील अधिवेशनात चर्चा करावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram