Pune Land Scam: 'चौकशी केली तर एक लाख कोटींचा घोटाळा बाहेर येईल', Vijay Wadettiwar यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
पुण्यातील (Pune) जमीन घोटाळ्यावरून (Land Scam) राजकारण तापले असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. 'पुण्यातल्या जमीन घोटाळ्याची चौकशी केली तर एक लाख कोटींचा घोटाळा बाहेर येईल', असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये घेतल्याचा आरोप केल्यानंतर, वडेट्टीवार यांनी हा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे पार्थ पवार घोटाळा केल्याचे नाकारत असताना, दुसरीकडे घोटाळा झालाच आहे, असा थेट दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement