Chhagan Bhujbal VS Suhas Kande: आगामी निवडणुकीत छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे संघर्ष पेटणार?

Continues below advertisement
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंढवा जमीन घोटाळ्यावरून (Mundhwa Land Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जमीन खरेदी प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'जर ओरडणं झाली नसती तर गुपचूप मधे अठराशे कोटीचा माल गिळून खुर्च केला असता ना,' असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर केला आहे. सरनाईक स्वतःच्या फायद्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शाळेच्या नावाखाली शासकीय जमीन घेऊ शकतात का, असा प्रश्न विचारत या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेल्या येवला, नांदगाव आणि मनमाड नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष पेटला आहे. इथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना बाजूला सारण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola