Vijay Shivtare : आजच्या बैठकीनंतर विजय शिवतारे पुढची दिशा ठरवणार : ABP Majha
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यात ठाम आहेत. १ एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तसेच १२ एप्रिलपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार असल्याची घोषणाही विजय शिवतारेंनी केलीय. आज शिवतारेंनी सासवडमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी घोषणा केलीय. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळू शकते.