Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचाही सातबारा नाही - विजय शिवतारे

Continues below advertisement

अजित पवार महायुतीत आले तरी विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाहीये.  काल एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली आहे.सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या जनतेचा केला असल्याचा शिवतारे यांनी म्हटलं आहे.. शिवतारे आणि अजित पवारांच्या वादाचे पडसाद बारामती लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतात. याचं कारण म्हणजे शिवतारे यांचं पुरंदर मतदारसंघ आहे, जो बारामती लोकसभा मतदारंसघात येतो. महायुतीला जर सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल, तर सहा पैक एका मतदारसंघातला नेता नाराज असणं फारसं परवडणारं नाहीये असं राजकीय जाणकार सांगतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram