Vijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारे

Continues below advertisement

Vijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारे 

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे कालपासून अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपापल्या मतदारसंघाचा रस्ता धरला होता. अशातच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलणारे शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनीही मंत्रिपदावरुन तिखट भाषेत नाराजी बोलून दाखवली आहे. मला मंत्रि‍पदाची अपेक्षा नव्हती. पण त्यापेक्षा मी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या वागणुकीने व्यथित झालो आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हे, अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली.

सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथील विधिमंडळातून बाहेर पडताना विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्हीदेखील नाराज आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विजय शिवतारे यांनी म्हटले की, मंत्रीपद मिळाले नाही, याचं काही वाटत नाही. पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रि‍पदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रि‍पदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram