Vijay Shivtare and Ajit Pawar : विजय शिवतारे अजित पवारांचा बदला घेणार? प्रकरण नेमकं काय?

Continues below advertisement

Vijay Shivtare on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत आले, तरी पुरंदर विधानसभेचे (Purandar Assembly Constituency) आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.             

रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं. तसेच, अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधला आहे.                   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram