Vijay Kumbhar on Pooja Khedkar : पूजा खेडकरांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करा -विजय कुंभार

Continues below advertisement

Vijay Kumbhar on Pooja Khedkar : पूजा खेडकरांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करा -विजय कुंभार प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (pooja Khedkar) यांच्या आयएएस होण्यासाठीचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. कारण, पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. तर, मसुरीतील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये त्यांना परत बोलवण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे खेडकर कुटुंबीय पुण्याच्या बाणेरमधील बंगल्याला कुलूप लावून पळून गेले आहेत. तर, दुसरीकडे पूजा खेडकर यांची परतवारी सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आता, याबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhirkari) यांनीही भूमिका मांडली आहे. तसेच, यापूर्वी दोन जणांची निवड रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली.   पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गंभीर आहे, आणि या गांभीर्याने सरकार पुढचे पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत पूजा खेडकर अजून कायम झालेल्या नाहीत, त्यांचे अद्याप प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे, राज्य सरकारने जे पाऊल उचलले आहे, ते योग्य आहे, असे अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणात कोणताही दबाव येऊ नये, दूध का दूध पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणीही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.  यापूर्वी दोघांची निवड रद्द? केंद्र सरकार आणि लाल बहादूर शास्त्री अकादमी यांनी हा तपास एका प्रकरणासाठी न ठेवता इतरांनी सुद्धा कोणी नियमांचा गैरफायदा घेतला नाही ना, हे देखील तपासून घेतलं पाहिजे. तसेच, याप्रकरणी कठोरपणे तपास झाला नाही तर व्यवस्थेला तडा जाईल. बोगस प्रमाणपत्रासंदर्भातील आरोप सिद्ध झाल्यास पूजा खेडकर यांच्यावर गंभीर कारवाई होऊ शकते, भारतीय प्रशासकीय सेवेत निवड रद्द झालेली याआधीची 2 प्रकरणे होऊन गेलेली आहेत, अशी माहितीही अविनाश धर्माधिकारी यांनी दिली.   पूजा खेडकर यांना आता मुसरीत परत बोलवण्यात आले आहे. त्यामुळे, लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना विविध प्रश्न विचारले जातील, तसेच कागदपत्रे सादर करावे लागतील, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. तसेच, जो कोणी खोटं प्रमाणपत्र देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram