Vidhrbha Rain Update : विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
Continues below advertisement
राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीय. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरलाय. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
Continues below advertisement