Vidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडले
Continues below advertisement
Vidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडले
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील 'जिल्हा मार्केटिंग फेडरेशन'च्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची खरेदी केली जाते.. आतापर्यंत या पाचही जिल्ह्यात जवळपास 35 हजार शेतकऱ्यांनी 12 लाख क्विंटल धानाची विक्री केली आहे. या धानाची एकूण किंमत 284 कोटी रुपये आहे. मात्र धान खरेदी केंद्र सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी पोर्टल अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहेत. मात्र नवीन सरकारनं याकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Continues below advertisement