Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज
Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Maharashtra Cabinet Expansion) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), नरेंद्र भोंडेकर, प्रकाश सुर्वे (Prakash Surve), विजय शिवतारे, राजेंद्र गावित, रवी राणा नाराज आहेत. याचे पडसाद नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील दिसले. छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर सुधीर मुनगंटीवर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिले. काल संध्याकाळीच तानाजी सावंत बॅग घेऊन पुण्यासाठी रवाना झाले. तानाजी सावंत देखील आज अधिवेशनाला अनुपस्थित होते. छगन भुजबळ काय म्हणाले? मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झालेत. भुजबळांच्या नाराजीची दखल राष्ट्रवादीनं घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधे छगन भुजबळ यांची भेट घेतली..राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आज विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेय. मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं किंवा बाजूला फेकलं तरी फरक पडत नाही, असं म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी प्रतिक्रिया देखील छगन भुजबळांनी दिली. यानंतर छगन भुजबळ अधिवेशन सोडून तातडीने नाशिकसाठी रवाना झाले.