Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24
Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली. त्यामध्ये,राज्यात सरासरी 65.10 टक्के मतदान झालं असून मुंबई मराठी पत्रकार संघात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालासाठी अंदाज वर्तविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईतील (Mumbai) पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील सरासरी अंदाजानुसार भाजपाप्रणीत महायुती ही 140 जागापर्यंत मजल मारू शकते, तर मविआची झेपही 138 जागापर्यंत पोहचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, इतर व अपक्षांसाठी 10 जागांचा अंदा व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच या अंदाज स्पर्धेनुसार महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा (Vidhansabha) अस्तित्वात येऊन अपक्षांची भूमिका किंगमेकरची राहील, असे चित्र आहे. त्यामुळे, राज्याच्या विधानसभा निवडणुंकासाठीच्या निकालाचीही चुरस आणखी वाढली आहे. मतदानानंतर विविध संस्थांच्या सर्वेक्षणातून महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शविण्यात आले होते. त्यामध्ये, 10 पैकी 7 संस्थांनी महायुती बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज होता. तर, 3 सर्वेक्षण संस्थांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.