Vidhan Sabha Election : विधानसभेच्या निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून 991उमेदवारी अर्ज दाखल

Continues below advertisement

Vidhan Sabha Election : विधानसभेच्या निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून 991उमेदवारी अर्ज दाखल 

हेही वाचा :

 नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात (loha vidhansabha Election) महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेकापचे श्यामसुंदर शिंदे ( Shyamsunder Shinde) आहेत. त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शेकापने जाहीर केली होती. मात्र या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने एकनाथ पवार (Eknath Pawar) यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळं एकनाथ पवार यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यावरून शेकापच्या महीला प्रदेशअध्यक्षा तथा आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मविआचा घटकपक्ष  म्हणून उमेदवारी  शेकापला पूर्वीच जाहीर झाली आहे. आम्हाला एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. मात्र उबाठा गटाने उमेदवारी कशी जाहीर केली माहीत नाही असे आशाताई शिंदे म्हणल्या. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आम्हाला उमेदवारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही उमेदवारी दाखल करणार आहोत. उबाठा गटाच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागेल. तसे आदेश त्यांना पक्षश्रेष्ठ करून येतील असा असा विश्वास अशाताई शिंदे यांनी व्यक्त केला. काहीही झालं तरी आम्ही निवडणूक लढवणारच असं त्या म्हणाल्या.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram