Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, कसबा पेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी, तर जतमधून गोपीचंद पडळकरांना संधी.
विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात, भाजप १५३, शिवसेना ८० आणि राष्ट्रवादी ५५ जागांवर लढणार, सूत्रांची माहिती, भाजपकडून पुन्हा एकदा ९ आकड्याचे गणित जुळवण्याचा प्रयत्न.
मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम, काही ठिकाणी उमेदवार अदलाबदल होण्याची शक्यता, वरळी, शिवडी, अंधेरी पूर्ववर शिवसेनेचा दावा, तोडगा काढून भाजप आज दुसरी यादी जाहीर करणार.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत विदर्भ आणि मुंबईतल्या तिढा असलेल्या जागांवर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरत यांची चर्चा, जागांची अदलाबदल होऊ शकते का याबाबतही बैठकीत चर्चा.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, तिसऱ्या यादीत २२ उमेदवारांची घोषणा, बीडमधून संदीप क्षीरसागर, उल्हासनगरमधून ओमी कलानी यांना उमेदवारी.
धाराशिवच्या परंडा मतदारसंघात ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांकडून उमेदवारांची घोषणा, ठाकरे गटाकडून रणजीत पाटील, तर, शरद पवार गटाकडून राहुल मोटेंच्या नावाची घोषणा, त्यामुळे मविआत नवा पेच.
परांड्यातून ठाकरे गटाचे रणजीत पाटील निवडणूक लढण्यावर ठाम, आपल्याकडे ए.बी फॉर्म, निवडणूक लढणारच, रणजीत पाटलांची भूमिका, शरद पवार पक्षाने उमेदवार दिल्यानंतर 'माझा'ला रणजीत पाटलांची प्रतिक्रिया.