Vidhan Sabha : विधानसभेचं बिगुल वाजताच विजयाचा कौल मिळावा म्हणून नेते मतदारांसोबतच ज्योतिषांच्या घरी

Continues below advertisement

Vidhan Sabha Election : विधानसभेचं बिगुल वाजताच नेत्यांचं 'टेम्पल रन', विजयाचा कौल मिळावा म्हणून नेते मतदारांसोबतच ज्योतिषांच्या घरी
राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं.. आणि सर्व पक्ष, नेते, कार्यकर्ते झाडून तयारीला लागलेत.. आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणं सुरू आहे... पण एवढ्यावरच थांबतील ते पुढारी कसे.. जनता जनार्दन आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी नेत्यांनी आता थेट, देवालाच साकडं घालण्यास सुरूवात केलीय.. निवडणूक काळात अनेक नेत्यांनी आपली कुंडली शुद्ध करून घेण्यास सुरूवात केली असून.. बगलामुखी सुदर्शन याग बटुक भैरव शतचंडीला, नेत्यांची सर्वाधिक पसंती असल्याचं.. ज्योतिषाचार्यांनी सांगितलंय... तसंच स्वबळ वाढवण्यासाठी आणि आकर्षण वाढावे यासाठी नेते अनुष्ठान तर करतातच.. शिवाय अर्ज दाखल करताना नेते शुभ मुहूर्तासाठी सध्या ज्योतिषाचार्यांच्या अपॉईंटमेट घेतायत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram