Vidarbha Flood Alert : विदर्भाला पावसाने झोडपलं; अनेक ठिकाणी पूरस्थिती
विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात २४ तासांत १५० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. एरंडा गाव दोन नद्यांमध्ये अडकून पूर्णपणे पाण्याखाली गेले. वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला. यवतमाळमधील गणेशपूर येथे छत कोसळून सहा मजूर जखमी झाले. बुलढाण्यात कांचन गंगा नदीला महापूर आला असून नागपूर-मुंबई जुना मार्ग बंद आहे.