Corona Alert | कोरोना संसर्गामुळं विदर्भातील परिस्थिती बिकट
कोरोना संसर्गामुळं विदर्भातील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अगदी झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं विदर्भ पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर आला आहे. कुठं संचारबंदी तर कुठं लॉकडाऊनचे निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत. कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं असून, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी काही पथकंही नेमण्यात आली आहेत.