Vidarbha 1 Phase Election : विदर्भातील 5 मतदारसंघात 54.85 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोलीत
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालं. देशात १०२ मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालंय. यात राज्यातल्या पश्चिम विदर्भातल्या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यात ५४.८५ टक्के मतदान झालंय.
पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७.००वा.पासून सुरू झालं. सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर मतदारसंघात ५५.७९ टक्के एवढं झालंय. देशात सर्वच भागात जोरदार उन्हाळा सुरू आहे. त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचं दिसून येतंय. मात्र काही भागात मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदान सुरू असलल्याचं दिसून आलं.