Victory Rally: मराठी भाषेच्या विजयाचा जल्लोष, 'दोन भाऊ' एकत्र!
आज विजय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा जो विजय झाला, तो साजरा करण्यासाठी आणि मराठी माणसांनी दाखवलेली वज्रमूठ साजरी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अनेक वर्षांनंतर 'दोन भाऊ' एकत्र आलेले हे चित्र दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जी भावना आहे, तीच भावना या मेळाव्यात व्यक्त होत आहे. अनेक तरुण-तरुणी देखील या मेळाव्यात सहभागी झालेले दिसत आहेत. मराठी माणसांनी अजून एकत्र येणे बाकी आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. मराठी समाजात अनेक गोष्टींमध्ये विभागणी झालेली आहे. त्यामुळे सर्वात आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस एकत्र आला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. सध्या लोकांनी बिघडवलेले वातावरण सुधारण्याची गरज आहे, असेही नमूद करण्यात आले. "महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र आला पाहिजे," हे या मेळाव्यातील प्रमुख विचार आहेत.