Vice President election | Sharad Pawar यांचा NDA ला नकार, Uddhav Thackeray यांची भूमिका गुलदस्त्यात

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी NDA कडून उमेदवार देण्यात आले असून, निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महायुतीच्या नेत्यांवरती जबाबदारी देण्यात आली आहे. एका नेत्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन करून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी समर्थन मागितले. उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मात्र, शरद पवार यांनी NDA चे उमेदवार आमच्या विचारांचे नाहीत असे थेट सांगत समर्थन देण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल." न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार आणि शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच, उद्धव ठाकरे यांनी एका विनंतीवर 'शक्य नाही' असे कळवले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola