Love Jihad: 'एग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा नवा ट्रेंड', विश्व हिंदू परिषदेचा Mumbai मध्ये गंभीर आरोप

Continues below advertisement
मुंबईतील बोरिवली येथील एका तरुणीने मुस्लिम तरुणासोबत लग्न न करता 'रिलेशनशिप एग्रीमेंट' केल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) याला 'लव्ह जिहाद'चा नवीन प्रकार म्हटले आहे. 'मुंबईमध्ये एग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावानं लव्ह जिहादचा नवीन ट्रेंड आलेला आहे', असा थेट आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. पीडित तरुणी, मालाडमध्ये शिकत असताना शाहिद शेख नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली आणि तिने त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांनी VHP च्या मदतीने तिला एकदा घरी परत आणले होते, पण ती पुन्हा पळून गेली. तिने आईच्या मोबाईलवर 'लिव्ह इन रिलेशनशिप विथ एग्रीमेंट' पाठवल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 'मला माझी मुलगी परत पाहिजे', अशी आर्त हाक तिच्या आईने 'एबीपी माझा'कडे दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola