सांगोल्यात ज्येष्ठ नेते Ganpatrao Deshmukh यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, ध्येयनिष्ठ पर्व संपलं

Continues below advertisement

सांगोल्यात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, ध्येयनिष्ठ पर्वाची अखेर!

'विधानसभेचे विद्यापीठ' अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. गणपतराव देशमुखांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 साली सोलापूर येथे झाला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात  होते.  1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.  2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram