Kite Festival | सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनाऱ्यावर पतंग महोत्सव | ABP Majha
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनाऱ्यावर पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पतंग महोत्सवाचं हे चौथं वर्ष आहे. या पतंग महोत्सवात महाराष्ट्रासह इतर राज्यातील पतंग प्रेमींनी हजेरी लावलीय. पतंग पर्यटन महोत्सवातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो. वेंगुर्लाची वेगळी ओळख जगाला व्हावी या उद्देशाने हा पतंग पर्यटन महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाला देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात..