Vegetable price hike : राज्यात भाज्यांचे दर कडाडले; मुंबईच्या बाजारपेठेतून आढावा ABP Majha
गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत सध्या महागाई कमी झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय.. तशी आकडेवारी देखील सरकारनं जाहीर केलीय.. मात्र या आकडेवारीवर कुणीही विश्वास ठेवणार नाही.. एक किलो टोमॅटोसाठी 60 रुपये तर एक किलो कांद्यासाठी 50 रुपये मोजावे लागताहेत.. एरवी 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणारा कोबी 60 रुपयांचा भाव खातोय.. इतर भाज्यांचे भाव देखील कडाडलेत... परतीच्या पावसाचा फटका आणि त्यात डिझेलनं गाठलेल्या शंभरीमुळं महागलेली मालवाहतूक यामुळं भाज्यांचे दर गगनाला पोहचले आहेत.. तरी देखील सरकार म्हणतंय की सध्या किरकोळ महागाई कमी झालीय...आणि हा दावा करणाऱ्यांना एकदा भाजी बाजाराचा फेरफटका मारायलाच सांगितलं पाहिजे